अनिल देशमुखांची जामिनासाठी सीबीआय न्यायालयात धाव

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला
अनिल देशमुखांची जामिनासाठी सीबीआय न्यायालयात धाव

शंभर कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी सीबीआयाने दाखल केलेल्या गुन्ह्यात कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जाची न्यायालयाने दखल घेत सीबीआयला १४ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय गुन्हा दाखल केला, तर ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला. २ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यापासुन सुमारे ११ महिने देशमुख ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in