
मुंबई : ईडीच्या रडावर असलेल्या राष्ट्रवादीचे नेते, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तांतर आणि बदलत्या राजकीय घडामोडींमुळे तपास यंत्रणेना संभ्रमात पडली आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याची वल्गना करणारी ईडी आत मूग गिळून गप्प आहे. मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेची सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत तहकूब करताना मुश्रीफ यांना अटकेपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले. कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित ४० कोटी रूपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित मुश्रीफ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स़त्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळताना अटकेपासून केवळ तीन दिवसाचे संरक्षण दिले.
या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्या वतीने अॅड. प्रशात पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाकडे वेळ मागून घेण्यात आला. मुश्रीफ यांच्या विरोधात पुरावे असल्याचा गाजावाजा करणाऱ्या ईडीने न्यायालयात नांगी टाकली आहे.