मुंबई इंडियन्सच्या अखेरचा सामन्यात अर्जुन तेंडुलकर खेळणार
आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर कधी पदार्पण करणार, यांची सर्व चाहत्यांना प्रतीक्षा असतानाच मुंबई इंडियन्सच्या अखेरचा सामन्यात तो खेळणार असल्याचे संकेत कर्णधार रोहित शर्माने दिले. त्यामुळे २१ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुन खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा अवघ्या तीन धावांनी पराभव केला. प्लेऑफमधून बाहेर पडलेली मुंबई इंडियन्सने या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी दिली. मुंबईचा संघ दोन युवा खेळाडूंसह मैदानात उतरला होता. पण त्यात अर्जुन तेंडुलकरला खेळवण्यात आले नाही.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या नाणेफेक दरम्यान रोहित म्हणाला की, आम्ही नवीन खेळाडूंना संधी देणार आहोत. त्यामुळे पुढील हंगामासाठी काही गोष्टी स्पष्ट होतील. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मयंक मार्कंडेय आणि संजय यादव यांना संधी देण्यात आली. शेवटच्या सामन्यातही काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाईल.
मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. मुंबई इंडियन्सने गेल्या हंगामातही अर्जुनला २० लाख रुपयांना खरेदी केले होते, पण त्याला एकाही सामन्यात खेळावले नव्हते. या हंगामातही तसेच घडले आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरचा फोटो मात्र सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट केला आहे.