राजावाडी रुग्णालयात रुग्णाने महिला नर्सला अपशब्द वापरला

 राजावाडी रुग्णालयात रुग्णाने महिला नर्सला अपशब्द वापरला

मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णाने कर्तव्यावर असलेल्या महिला नर्सला अपशब्द वापरला. याचा निषेध म्हणून सोमवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. दरम्यान, टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शनिवार, ४ जून रोजी हेमलता बांगर या एमआयसीयूमध्ये कार्यरत होत्या. सायंकाळी बेडवरील चादर बदलण्यासाठी त्या आल्या असत्या हृदयरोगावर उपचार घेणाऱ्या नूर मोहम्मद या रुग्णाने त्यांना अपशब्द वापरले. यावेळी तुम्ही फुकट पगार घेता, रुग्णालयाच्या बाहेर या तुम्हाला बघून घेतो, अशा शब्दांत धमकीही दिली. याचा निषेध म्हणून राजावाडी रुग्णालयात नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. नर्सला अपशब्द वापरल्याने रुग्णालय प्रशासनाने टिळकनगर पोलिसांना पत्र दिले. तसेच हेमलता बांगर यांच्या तक्रारीवरून नूर मोहम्मद या रुग्णावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र नूर मोहम्मद हा रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याला डिस्चार्ज दिल्यावर अटक केली जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in