मुंबई : बोगस दस्तावेजाच्या मदतीने फ्लॅट बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मुरलीधर केशवन नायर, विलासनी मुरलीधर नायर, सुजीत मुरलीधर नायर अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिासकडून चौकशी होणार आहे. व्यवसायाने बिल्डर असलेल्या वयोवृद्ध तक्रारदाराने काही वर्षांपूर्वी मालाड येथे १६ मजली इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीमध्ये त्यांच्या मालकीचे ३१ फ्लॅट होते. याचदरम्यान ओळख झालेल्या मुरलीधरने त्यांना बोरिवलीतील एका जमिनीचे आमीष दाखवले होते. त्या मोबदल्यात मालाड येथील इमारतीमध्ये पाच फ्लॅटसह १ कोटी १० लाख रुपयांचा करार त्यांच्यात झाला होता. मात्र या जागेबाबत चुकीचा माहिती देण्यात आल्याने त्यांच्यात पुन्हा बोलणी झाली होती. यावेळी पाचपैकी चार फ्लॅट आणि उर्वरित कॅश देण्याचे ठरले होते. अशाप्रकारे त्यांनी चार फ्लॅट आणि रक्कम घेतली होती. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, चिन्नप्पा ॲॅन्थोनी यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती.