
मुंबई : शासकीय कर्तव्य बजाविताना दोन पोलीस शिपायांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार गोरेगाव आणि कफ परेड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिडोंशी आणि कफ परेड पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. रुपेशकुमार राजेंद्र भागवत हे शिवडी पोलीस वसाहतीत राहत असून, सध्या कफ परेड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या पोलीस ठाण्यात गुलाम शेखविरुद्ध दंगल घडवून मारामारी करणे, शिवीगाळ करून जिवे मारणयाची धमकी दिल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांत तो पाहिजे आरोपी होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले. समन्स मिळताच तो त्याच्या वकिलासोबत पोलीस ठाण्यात हजर झाला होता.