बच्चू कडू यांना विशेष सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

बच्चू कडूंच्या जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार की नाही, याबाबत काही काळ साशंकता होती
 बच्चू कडू यांना विशेष सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

मंत्रालयीन कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणणे माजी मंत्री आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांना चांगलेच महागात पडणार होते. या गुन्ह्यात गिरगाव येथील स्थानिक न्यायालयाने बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसेच गिरगाव कोर्टाने त्यांचा जामीन अर्जही फेटाळून लावला होता; मात्र त्यांनी विशेष सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर तेथे बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला.

बच्चू कडूंच्या जामीन अर्जावर विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होणार की नाही, याबाबत काही काळ साशंकता होती; पण अखेर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. बराच वेळ युक्तिवाद चालल्यानंतर कोर्टाने अखेर बच्चू कडू यांचा जामीन मंजूर केला. कोर्टाने त्यांना १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. प्रिन्सिपल न्यायालयाकडून ५४ नंबर कोर्टामध्ये मेन्शनिंग करण्याचे निर्देश त्यांना दिले गेले. यावेळी न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बच्चू कडू यांच्या लीगल टीमला धारेवर धरले. तुमच्या चुकांमुळे आमचे टेन्शन वाढते. अखेर कोर्टाने बच्चू कडू यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ सप्टेंबरला होईल, असे कोर्टाने जाहीर केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in