वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

 वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला होता. मात्र, मंगळवारी वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा फटका बसलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा, अशीही मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यात तातडीने सूचना देऊन ते बदलण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. आमच्याशी चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवले जाणार नाही. तसेच कंत्राटी कामगारांना सुरक्षा देण्याबाबत चर्चाही या बैठकीत झाली.

सुधारीत बिलाला वीज

कर्मचाऱ्यांचा विरोध

नोकरभरती ही जाहिरातीच्या माध्यमातून होते. तसेच कंत्राटी कामगारांच्या बाबतीत व्हावे, अशीही मागणी त्यांनी ठेवली आहे. त्याबाबतही सकारात्मक चर्चा बैठकीत झाली आहे. आमचे आंदोलन हे केद्र शासनाच्या नव्या बिलाविरोधात होते. यावर ऊर्जामंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका कळवत शासनाचा विरोध जाहीर केला आहे. २००३ च्या सुधारीत बिलाविरोधात वीज कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तसेच खासगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव सध्या नाही. मात्र, केंद्राच्या तशा धोरणाला विरोध असेल, असे यावेळी कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आले. केद्र सरकारकडून खासगीकरणाचा घाट घातला जातोय, असा आरोप वीज कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे हा संप सुरू झाला होता. मात्र, राज्याने आपली भूमिका याविरोधात असल्याचे आश्वासन वीज कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या भूमिकेत बदल करत हा संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

Related Stories

No stories found.