पर्यावरणाच्या संरक्षणासाठी 'बेस्ट' उपक्रम

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ९०० इलेक्ट्रीक वातानुकूलित बस दाखल होणार
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी 'बेस्ट' उपक्रम

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पाऊल उचलले आहे. पर्यावरणपूरक बस थांबे बनवण्यात येत आहे. त्यामुळे डबल डेकर बस मुंबईची शान असून डबल डेकर बसची शान वाढवणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ९०० इलेक्ट्रीक वातानुकूलित बस दाखल होणार असून पहिली एसी डबल डेकर बस ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाच्या वर्धापनदिनी लाँच करण्याचा प्रयत्न आहे.

प्रवाशांना प्रवास गारेगार व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात वातानुकूलित बस दाखल होत आहेत. जुन्या डबल डेकर बसेसचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने एसी डबल डेकर बस घेण्यात येणार आहे. ९०० एसी डबल डेकर बसेस घेण्यात येणार असून पहिली एसी डबल डेकर बस बेस्ट उपक्रमाच्या वर्धापनदिन लाँच करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षी मार्चपर्यंत २,१०० इलेिक्ट्रक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in