
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी, भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर टिप्पणी करताना, 'टिल्ल्या लोकांनी काही सांगायचे कारण नाही' असे म्हणाले होते. यावरून आता नितेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली. नितेश राणेंनी पुन्हा एका अजित पवारांचा 'धरणवीर' असा उल्लेख करत जोरदार टीका केली. नितेश राणेंनी ट्विट केले की, देवाने मला दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य करुन अजित पवारांची वैचारिक उंची कळली," असा टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की, "लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे 'धरणवीर' यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली. यावरून हेही सिद्ध झाले की, यांना ‘औरंग्यावरची' टिका सहन होत नाही. म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही." अशी घणाघाती टीका केली.
काय म्हणाले होते अजित पवार?
काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला होता. नितेश राणे म्हणाले होते की, "शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत, शिवाय ते आजपर्यंत कधीही रायगडावर गेले नाहीत." यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "टिल्ल्या लोकांनी असे सांगायचे काही कारण नाही. त्यांची उंची किती? आणि त्यांची झेप किती? मी का त्यांना उत्तर देऊ? माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. मी अशा लोकांच्या नदी लागत नाही." यामुळे नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली.