मुंबई प्रदूषणात विळख्यात बीकेसी, वरळी चेंबूर मधील हवा खराब वरळीत एक्यूआय ३००, तर मालाडमध्ये २५४

वरुणराजाने माघार घेतल्यानंतर मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालवला आणि प्रदूषणात वाढ झाली आहे.
मुंबई प्रदूषणात विळख्यात बीकेसी, वरळी चेंबूर मधील हवा खराब वरळीत एक्यूआय ३००, तर मालाडमध्ये २५४

मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून, सरासरी एअर क्लालिटी इंडेक्स २०१ वर पोहोचला आहे. वरळीतील एक्यूआय ३०० वर पोहोचला असून मालाड, चेंबूर, बीकेसी व बोरिवलीतील हवा खराब झाली आहे. त्यामुळे मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, वाढत्या प्रदूषणावर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे कान टोचले आहेत.

वरुणराजाने माघार घेतल्यानंतर मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर खालवला आणि प्रदूषणात वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने नियमावली जारी केली असून, बांधकाम ठिकाणी धुळीचे कण पसरु नये ३५ फूट उंच भिंत बांधणे स्प्रिकलर बसवणे धुळीचे कण पसरु नये यासाठी कापडी पडदे बांधणे, अशी नियमावली जारी केली आहे. नियमावलीचे पालन होत नसल्याने बांधकाम ठिकाणी स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तरीही धुळीचे कण पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम ठिकाणी योग्य उपाययोजना होत नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पालिकेला धारेवर धरले. त्यानंतर कठोर कारवाई करण्याचा इशारा देत डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या डंपरवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी फटाक्या फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले. रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडा उच्च न्यायालयाच्या या निर्देशाकडे दुर्लक्ष करत रात्री १२ वाजेपर्यंत फटाके फोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रदूषणात वाढ झाली असून, हवेचा गुणवत्ता स्तर खालवला आहे. यामुळे मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईमधील हॉटस्पॉट

वरळी - ३०० एक्यूआय

बीकेसी - २६९ एक्यूआय

चेंबूर - २२० एक्यूआय

माझगाव - १९७ एक्यूआय

मालाड - २५४ एक्यूआय

नवी मुंबई - २०० एक्यूआय

एकूण सरासरी - २०१ एक्यूआय

एमपीसीबीने केलेली एक्यूआय नोंदणी

बीकेसी - २९८

चेंबूर - २९८

विलेपार्ले पश्चिम - २४०

सायन - २३८

कुलाबा - २१५

कांदिवली - २०४

वरळी - १८९

बोरिवली पूर्व - ११७

logo
marathi.freepressjournal.in