पाळीव श्वानांसाठी आता कर भरणे बंधनकारक; पाळीव श्वानाचा परवानाही बंधनकारक

पाळीव कुत्रा पाळायचा तर नियमांचे पालन करणे यासह वार्षिक कर भरणे आता बंधनकारक आहे. इमारतीतील घरमालक कुत्रा पाळत असेल तर सोसायटीला तसे पत्र देणे बंधनकारक आहे. पाळीव कुत्र्याचा परवाना केंद्राचा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुत्रा पाळण्यावरून सोसायटीत होणारे वादविवाद यामुळे टळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाळीव कुत्रा पाळण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.
पाळीव श्वानांसाठी आता कर भरणे बंधनकारक; पाळीव श्वानाचा परवानाही बंधनकारक
Published on

मुंबई : पाळीव कुत्रा पाळायचा तर नियमांचे पालन करणे यासह वार्षिक कर भरणे आता बंधनकारक आहे. इमारतीतील घरमालक कुत्रा पाळत असेल तर सोसायटीला तसे पत्र देणे बंधनकारक आहे. पाळीव कुत्र्याचा परवाना केंद्राचा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुत्रा पाळण्यावरून सोसायटीत होणारे वादविवाद यामुळे टळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाळीव कुत्रा पाळण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे.

भटके श्वान आणि मांजरी या समुदाय प्राण्यांना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच, पाळीव श्वानासंदर्भात निश्चित करण्यात आलेले कर महानगरपालिकेकडे भरणे आणि पाळीव प्राण्यांच्या परवानासंदर्भातील नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. या संदर्भात प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहे.

सर्वोच्च न्यायालय तसेच भारतीय प्राणी कल्याण मंडळांच्या निर्देशांनुसार, मालक, अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींसाठी पाळीव व भटक्या प्राण्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशू वैद्यकीय आरोग्य विभागाच्या https://vhd.mcgm.gov.in/ संकेतस्थळावर सविस्तर स्वरुपात उपलब्ध आहेत. पाळीव प्राण्यांचे मालक, प्राण्यांना अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या अनेक नागरिक पाळीव श्वानांना सहचर म्हणून ठेवतात.

प्राणीमित्र, कार्यकर्ते भटक्या श्वानांची देखभाल, उपचार आणि अन्न पुरवठा करून संवेदना व्यक्त करतात. मात्र, अनेकवेळा पाळीव प्राणीमालक, भटक्या प्राण्यांचे काळजी वाहक, निवासी कल्याण संस्था व गृहनिर्माण संस्था यांच्यात मतभेद होतो. या पार्श्वभूमीवर, मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in