मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मरियमबिबी ऊर्फ सुंदरी या ३३ वर्षांच्या महिलेची तिच्याच प्रियकराने हत्या करून पळून गेलेल्या शहाबुद्दीन नजरुल गाजी या आरोपी प्रियकराला सांताक्रुझ पोलिसांनी पनवेल येथून अटक केली. हत्येनंतर तो कोलकाता येथील गावी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वीच त्याला अटक करुन गुरुवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आल होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शहाबुद्दीन हा सुंदरी नावाच्या एका महिलेसोबत राहत होता. त्याने सुंदरी ही त्याची पत्नी असल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्या दारू पिण्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. अखेर त्याचा मित्र राजमोहम्मद घरी गेला असता, सुंदरी बेशुद्धावस्थेत दिसून आली. सांताक्रुझ पोलिसांनी सुंदरीला कूपर रुग्णालयात दाखल केले असता, तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर कोलकाताला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शहाबुद्दीनला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली.