पहाटेच्या सुमारास कळवा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी तब्ब्ल १ तास लागल्याने लोकलच्या वेळापत्रकात बिघाड
File Photo
File PhotoANI

कळवा स्थानकाजवळ मंगळवार २८ जून रोजी पहाटेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूकीचा खोळंबा झाला. याचाच परिणाम कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर होत या लोकल उशिराने धावत होत्या. दरम्यान, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी तब्ब्ल १ तास लागल्याने लोकलच्या वेळापत्रकात बिघाड झाल्याचे निदर्शनास आले.

कळवा स्थानकाजवळील कारशेड ते डाउन धीम्या मार्गावर मंगळवारी पहाटे ४.३० च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड झाला. या बिघाडावेळी कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना सिग्नल मिळत नसल्याने लोकल गाड्यांचा वेग काहीसा मंदावला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या दुरुस्तीसाठी १ तास एवढा अवधी लागल्याने कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीतून सीएसएमटीच्या दिशेने सुटणाऱ्या लोकलवरही झाला. सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीचे काम सकाळी ५.३० पर्यंत पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in