कर्करोग रुग्णांना मिळणार स्वस्तात औषधे

कर्करोग रुग्णांना मिळणार स्वस्तात औषधे

कर्करोग रुग्णांच्या उपचारासोबत औषधोपचाराचा खर्च देखील परवणारा नसतो. त्यामुळे वन रुपी क्‍लिनिकच्या माध्यमातून आता रुग्णांचा ताण नक्कीच कमी होणार आहे. गरीब आणि औषधोपचाराचा खर्च न परवडणार्‍या रुग्णांसाठी वन रुपी क्‍लिनीक कडून स्वस्त औषधे १ जूनपासून देण्यात येणार असल्याने प्रत्येक रुग्ण आपले उपचार पुर्ण करू शकणार आहे, असे वनरुपी क्‍लिनीकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

कर्करोगाचे निदान उशीरा झाल्याने या रोगाच्या रुग्णांना अनेक दिवस उपचार घ्यावे लागतात. आधीच टाटा रुग्णालयातील रुग्ण संख्यी दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांना उपचारास देखील वाट पहावी लागते. त्यामुळे औषधांचा खर्च वाढत जातो. त्यामुळे औषधांचा खर्च कमी व्हावा यासाठी वन रुपी क्‍लिनीकडून स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे किमान औषधावरील किमतीचा भार काही प्रमाणात कमी होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in