वाडिया रुग्णालयात मुलांची अदलाबदली डॉक्टर, नर्सविरोधात गुन्हा दाखल

प्रसूती होत असताना मी बेशुद्ध होते. त्यावेळी माझ्या बाळाला आयसीयूत हलवण्यात आले.
वाडिया रुग्णालयात मुलांची अदलाबदली डॉक्टर, नर्सविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : परळच्या वाडिया रुग्णालयात नवजात शिशूंची अदलाबदली झाल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात डॉक्टर व नर्सेसविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना जूनची असून या प्रकरणी तपास सुरू झाला आहे. तसेच अदलाबदली झालेल्या मुलांची व त्यांच्या पालकांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. मुलगा झालेल्या कुटुंबाने दावा केला की, त्यांना मुलगी सोपवण्यात आली.

सुनीता गनजेजी (४१) यांनी तक्रारीत नमूद केले की, वाडिया रुग्णालयात ७ जून रोजी मी बाळाला जन्म दिला. माझी प्रसूती रात्री ९.३० ते ११ दरम्यान झाली. प्रसूती होत असताना मी बेशुद्ध होते. त्यावेळी माझ्या बाळाला आयसीयूत हलवण्यात आले. त्यावेळी माझे बाळ बदलण्यात आले. मी खासगी लॅबमध्ये जाऊन डीएनए चाचणी केली. तेव्हा बाळाची व माझा डीएनए जुळला नाही, असे गनजेजी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून डॉक्टर, नर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, गनजेजी यांनी बाळाला जन्म दिला तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दाम्पत्य व मुलाचे डीएनएचे नमूने कलिना लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. मुलाला जन्म दिल्याचा तक्रारदाराचा दावा आहे. मात्र, मुलाऐवजी तिला मुलगी दिली. तक्रारदार महिलेने रुग्णालय प्रशासनाकडे ऑगस्टमध्ये याबाबत तक्रार केली होती, असे पोलीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in