आझाद मैदानातील न्यू ईरा मैदानात झालेल्या सामन्यात कॅथलिक जिमखानाचा स्पोर्ट्स अँड रिक्रिएशनवर विजय

आझाद मैदानातील न्यू ईरा मैदानात झालेल्या सामन्यात कॅथलिक जिमखानाचा स्पोर्ट्स अँड रिक्रिएशनवर विजय

वैभव पाटीलची ७५ धावांची खेळी तसेच मनिंद्रा प्रतापच्या पाच विकेट याच्या बळावर कॅथलिक जिमखाना संघाने एमसीए एच. डी. कांगा लीग नॉकआउट क्रिकेट स्पर्धेत ग्र्रुप डीमध्ये अणुशक्‍ती नगर स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन क्‍लबवर ९६ धावांनी मोठा विजय मिळवला.

आझाद मैदानातील न्यू ईरा मैदानात झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून कॅथलिक जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना ४३.४ षटकांत २४३ अशी मोठी धावसंख्या उभारली. अणुशक्‍ती नगर स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन क्‍लबचा संघ ३५.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला.

अन्य लढतीत स्पोर्ट्सफिल्ड सीसीने यंग मेन सीसीवर तीन विकेट राखून मात केली. अथर्व सुर्वेने नाबाद 50 धावा करताना विजयात मोलाचे योगदान दिले. जॉली फ्रेंड्स सीसीने चुरशीच्या सामन्यात बेंगाल क्‍लबचा १४ धावांनी पराभव केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in