मध्य रेल्वे कडुन कालावधीत मुंबई विभागातील तब्बल ११६ स्थानकांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मध्य रेल्वे कडुन कालावधीत मुंबई विभागातील तब्बल ११६ स्थानकांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन

प्रवाशांना चांगल्या सुविधा देत असताना रेल्वेस्थानकांवरही स्वच्छता ठेवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. मध्य रेल्वेने १० ते १४ मे या कालावधीत मुंबई विभागातील तब्बल ११६ स्थानकांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे.

‘स्वच्छता ही सेवा’ हे ब्रीदवाक्य अंगी बाळगत या मोहिमेत शाळा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, स्काऊट्स गाईड्स, सफाई कर्मचारी, अधिकारी, पर्यवेक्षक आणि विविध शाखा आणि स्थानकातील कर्मचारी अशा एकूण पाच हजार ९०० व्यक्तींनी सहभाग घेतला. उपनगरीय रेल्वे मागार्वरील स्थानके प्रतिदिन लाखो प्रवाशांच्या वर्दळीने गजबजलेली असतात. रेल्वे प्रशासनाकडून स्थानकातील सोयीसुविधा तसेच स्थानकातील स्वच्छता कायम ठेवण्यासाठी विविध नियोजन, योजना तसेच उपक्रम राबवले जातात; मात्र तरीदेखील बहुतांश स्थानकांवर प्लास्टिक कचरा, भिंतीवर गुटखा-माव्याचा पिचकाऱ्या, रेल्वे रुळांलगत नाल्याची दुर्गंधी, अस्वच्छ शौचालये पाहायला मिळतात. वारंवार प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करूनही यामध्ये फारसा बदल दिसून येत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. परिणामी, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत ‘रोज स्वच्छतेची खात्री’ या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in