
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल एक्स्प्रेस व उपनगरीय लोकलचा वक्तशीरपणा कायम आहे. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा ८५ टक्के आणि उपनगरीय गाड्या ९५ टक्के वक्तशीरपणा धावल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर या पाच विभागांचा अहवाल मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर १ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण ३७,०४० मेल एक्सप्रेस गाड्या चालवल्या आहेत. तसेच दररोज १,८१० उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जात हे एक उल्लेखनीय कार्य असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये १५ टक्के आणि उपनगरीय गाड्यांमध्ये ५ टक्के वक्तशीरपणा न पाळण्याची ४०.३३ टक्के बाह्य घटकांमुळे व ५९.६७ टक्के अंतर्गत तांत्रिक बिघाड असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर अन्य झोन मधून १२.५५ टक्के मेल एक्सप्रेस गाड्या उशिराने आल्या.
रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांना पाचारण!
ऑन कॉल डॉक्टरांना ट्रेनमध्ये पेशंटच्या उपचारांसाठी बोलवण्याच्या १२७ प्रकरणे अर्थात ६.७३ टक्के
चेन पुलिंग, लेव्हल क्राॅसिंग
-अलार्म चेन पुलिंगच्या १,४९० घटना घडल्या असून चालू आर्थिक वर्षात ६.५० टक्के
-लेव्हल क्रॉसिंग गेट्स वारंवार उघडणे- ५.६६ टक्के
-खराब हवामान- ५.५० टक्के
-ट्रेनपासिंग - ३.३९ टक्के
लोको बिघाडात घट
इलेक्ट्रिक आणि डिझेल लोकोमध्ये बिघाड
गेल्या वर्षीच्या ९७ च्या तुलनेत चालू वर्षात ७४ प्रकरणे आली ( बिघाडात २३.७१ टक्के घट)
इएमयू रेकचे युनिट दोष-
गेल्या वर्षीच्या ५० प्रकरणांच्या तुलनेत या वर्षात ३३ प्रकरणे आली ( बिघाडात ३४ टक्के घट)
ट्रॅक डिफेक्टमध्ये घट
-वेल्ड फेल्युअर, रेल्वे फ्रॅक्चर इ.
-गेल्या वर्षीच्या २०१ प्रकरणांच्या तुलनेत चालू वर्षात १४५ प्रकरणे (२७.८६ टक्के घट)
सिग्नल फेल्युअर
गेल्या वर्षीच्या १७७ केसेसच्या तुलनेत या वर्षी १२४ केसेस (२९.९४ टक्के घट)