मालगाडीत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

मालगाडीत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बिघाड सत्र सुरूच असून मागील काही दिवसांपासून प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच बुधवार (ता.२५) रोजी वाशिंद आसनगाव दरम्यान मालगाडीत पहाटे ६ च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली. परिणामी कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली. यामुळे सकाळी कामावर जाण्यास निघालेल्या प्रवाशांना लोकल विलंबाचा त्रास सहन करावा लागला.

 पश्चिम रेल्वे मार्गावर रात्र-दिवस सुपरफास्ट एक्सप्रेस, एक्सप्रेस, लांब पल्ल्याच्या गाड्या, पॅसेंजर आणि मालगाडया धावत असतात. तसेच मध्य रेल्वेवरही कसारा पासून ते मुंबई सीएसटीपर्यंत देखील अनेक लोकल-एक्सप्रेस धावत असतात. या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या घटनांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली. ऐन गर्दीच्या वेळेस पहाटेच्या सुमारास मालगाडी थांबल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प पुर्णपणे ठप्प झाली. यामुळे लोकल विलंबाने धावत असल्याने स्थानकात सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, बिघाड झाल्याच्या पुढच्या काही वेळातच मालगाडी दुरुस्त करण्याचे काम रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in