मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षात ६२६ उन्हाळी विशेष ट्रेन सुरू करणार

मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षात ६२६ उन्हाळी विशेष ट्रेन सुरू करणार

उन्हाळ्यातील हंगामात प्रवाशांची सतत वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षात आपल्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त ६२६ उन्हाळी विशेष ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. २०१९ आणि २०२१ मध्ये उन्हाळ्यातील विशेष ट्रेनची संख्या अनुक्रमे ५४० आणि ४३५ एवढी होती. तर २०२०मध्ये कोरोना साथीच्या कारणाने उन्हाळ्यात विशेष ट्रेन चालविण्यात आल्या नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या मध्य रेल्वेवरील सर्वाधिक संख्या ठरत आहे. जून महिन्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत असणाऱ्या या एकूण उन्हाळी गाड्यांची संख्या ६२६ एवढी आहे. या उन्हाळी विशेष गाड्या सीएसएमटी, मुंबई, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर, साईनगर, शिर्डी सारख्या मध्य रेल्वेतील स्थानकांपासून विविध गंतव्यस्थानाकरिता चालविण्यात येणार आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, मऊ, समस्तीपूर, बनारस तसेच थिविम दरम्यान ३०६ गाड्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाऊन तसेच रिवा दरम्यान २१८ गाड्या, पुणे आणि करमळी, जयपूर दानापूर, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन तसेच कानपूर सेंट्रल दरम्यान १०० गाड्या, नागपूर आणि मडगाव दरम्यान २० गाड्या, साईनगर शिर्डी आणि ढहर का बालाजी दरम्यान २० गाड्या, पनवेल आणि करमळी दरम्यान १८ विशेष गाड्या, दादर आणि मडगाव दरम्यान सहा विशेष गाड्या, लातूर आणि बिदर दरम्यान दोन विशेष गाड्या धावणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in