वैयक्तिक कामांसाठी चार्टर्ड विमान वापरले नाही;माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे प्रतिज्ञापत्र

चार्टर्ड विमानातून प्रवास करून राज्य वीज कंपन्यांचे ४० लाख रुपये बेकायदेशीर वापरले आहेत.
वैयक्तिक कामांसाठी चार्टर्ड विमान वापरले नाही;माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे प्रतिज्ञापत्र

कोविड-१९ च्या लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही, तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला होता, असा दावा ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी उच्च न्यायालयात केला आहे. तसे प्रतिज्ञापत्रच त्यांनी सादर केले.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळात चार्टर्ड विमानातून प्रवास करून राज्य वीज कंपन्यांचे ४० लाख रुपये बेकायदेशीर वापरले आहेत. राऊत यांनी जून ते सप्टेंबर २०२० काळात मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली दरम्यान अनेकदा चार्टर्ड विमानातून केलेला प्रवास प्रशासकीय कामाचे कारण देत कर्जबाजारी असलेल्या वीज कंपन्यांना ४० लाख रुपये बिल भरण्यास भाग पाडले, असा आरोप करून मंत्र्यांकडून प्रवासासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in