छत्रपती संभाजीनगर राड्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या २ गटांमधील हिंसाचारावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आवाहन
छत्रपती संभाजीनगर राड्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
@ANI

काल रात्री २ वाजता किऱ्हाडपुरा येथे दोन गटांमध्ये मोठा हिंसाचार झाला. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. यामध्ये पोलिसांच्या गाडीचादेखील समावेश होता. हा हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, तसेच अश्रुधुरांचादेखील वापर करण्यात आला. एकीकडे विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी राज्य सरकरवर टीका केली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. "सर्वधर्मियांनी शांतता बाळगावी, राज्यात कायदा, सुव्यवस्था अबाधित राखले जाईल, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे" असे आवाहन करताना म्हंटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "छत्रपती संभाजीनगरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सर्वांनी शांतता राखून रामनवमीचा उत्सव साजरा केला पाहिजे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्वधर्मीयांना माझे आवाहन आहे की, इतके वर्षे आपण सण आनंदाने साजरे करत आलो आहोत. आत्ताही शांतता राखून उत्सव साजरे करा. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे." दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि खासदार संजय राऊत यांनी यामागे राज्य सरकारचा हात असल्याची टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in