मुख्यमंत्री शिंदे यांनी केली बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची घोषणा

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद दिले आहे
मुख्यमंत्री शिंदे यांनी केली बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे शनिवारी जाहीर केली आहेत. मुंबई शहरच्या पालकमंत्रिपदी दीपक केसरकर तर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी मंगलप्रभात लोढा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद दिले आहे

पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिराेली, शंभुराज देसाई - सातारा, ठाणे, रवींद्र चव्हाण - पालघर, सिंधुदुर्ग, उदय सामंत - रत्नागिरी, रायगड, चंद्रकांत पाटील - पुणे, तानाजी सावंत - परभणी, उस्मानाबाद (धाराशिव), राधाकृष्ण विखे-पाटील - अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार - चंद्रपूर, गोंदिया, विजयकुमार गावित - नंदुरबार, गिरीश महाजन - धुळे, लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव, दादा भुसे - नाशिक, संजय राठोड - यवतमाळ, वाशिम, सुरेश खाडे - सांगली, संदीपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), अब्दुल सत्तार - हिंगोली, दीपक केसरकर - मुंबई शहर, कोल्हापूर,

अतुल सावे - जालना, बीड, मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in