मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा - नारायण राणे

न पाळलेली आश्वासने यातून एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यातून त्यांनी हे बंड केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा - नारायण राणे

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनीदेखील या सगळ्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “वारंवार दिलेली अपमानास्पद वागणूक आणि न पाळलेली आश्वासने यातून एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यातून त्यांनी हे बंड केले. बाळासाहेब ठाकरेंनी ४८ वर्षांहून जास्त काळ शिवसेना पक्ष सांभाळला, वाढवला. शिवसैनिकांना प्रेम आणि विश्वास दिला. त्याउलट मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख असताना अडीच वर्षही पक्ष सांभाळता आला नाही. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचं नाही आणि फक्त आदेश द्यायचे. त्यामुळेच गुदमरलेले शिवसैनिक, मंत्री आणि आमदारांनी त्यागाच्या भूमिकेतून हा बंड केला आहे. असे सर्व काही होत असतानाही उद्धव ठाकरे यांनी एक क्षणही मुख्यमंत्रीपदी असता कामा नये. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,” असे राणे म्हणाले आहेत.

“एकनाथ शिंदेंची भूमिका मी ऐकली. शिवसेनेचे प्रतिनिधी त्यांना सूरतला भेटले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून भाजपासोबत आलात, सरकार स्थापन केले तर आम्ही विचार करू, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. शिंदेंची भूमिका ही हिंदुत्ववादी विचारांची असून अडीच वर्षांपूर्वी फसवणूक झाली हेही ते कबूल करत आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड झाली हेही त्यांना माहिती आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in