फडणवीस यांच्या ‘पेन ड्राइव्ह’चा तपास सीआयडीकडे लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे गृह विभागाचे आदेश

फडणवीस यांच्या ‘पेन ड्राइव्ह’चा तपास सीआयडीकडे 
लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे गृह विभागाचे आदेश

विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच खळबळ उडवून दिली होती. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे भाजप नेते व आमदार गिरीश महाजन यांना अडकवण्याचा कट आखत असल्याचा आरोप या व्हिडीओच्या माध्यमातून फडणवीस यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवावा, अशी भाजपची मागणी होती. मात्र, राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे. तसेच, याप्रकरणी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

भाजपने या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे चौकशी करण्याची मागणी करत सभात्यागही केला होता. सीबीआयतर्फे या प्रकरणाचा तपास करावा, अशी भाजपची मागणी होती. मात्र, राज्य सरकारने राज्य गुप्तवार्ता विभाग म्हणजेच सीआयडीतर्फेच या प्रकरणाचा तपास करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. अखेर गृह विभागाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने आता सीआयडी तपासावर शिक्कामोर्तब केल्याने भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in