मुंबई
Maharashtra Budget Session : मराठी भाषा दिनी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; सभागृहात छगन भुजबळांची मागणी
राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत (Maharashtra Budget Session) केली मागणी
आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) सुरुवात झाली असून सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी, 'मराठी भाषेला (Marathi) अभिजात भाषेचा दर्जा द्याच' अशी मागणी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले की, आपण लवकरच माझ्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ आणि ही मागणी करू. नक्कीच ते आपली ही विनंती मान्य करतील, असा विश्वास त्यांनी दर्शवला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, "मराठी भाषेचे वय हे सध्या अडीच हजार वर्षे झाले आहे. आपली ही भाषा संस्कृतपेक्षाही जुनी आहे. त्यामुळे सध्या राजकारण मध्ये न अनंत पाठपुरावा केला जावा." अशी मागणी मराठी भाषा दिनी सभागृहात केली.