हिंमत असेल तर मैदानात या; उद्धव ठाकरे यांचे शिंदे गट, भाजपला आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात उद्धव ठाकरे बोलत होते
हिंमत असेल तर मैदानात या; उद्धव ठाकरे यांचे शिंदे गट, भाजपला आव्हान

हिंमत असेल तर मैदानात या, मी मैदानात उतरलो आहे. होऊन जाऊ दे काय व्हायचे ते. अनेक वादळे शिवसेनेने बघितली आहेत; पण आता वादळे निर्माण करणारे शरद पवार सोबत आहेत. मी आता लढाईच्या क्षणाचीच वाट पाहत आहे. ही माझ्या एकट्याची किंवा शिवसेनेची लढाई नाही. ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमच्यासाठी मशाल केवळ निशाणी नाही तर विचारांची धगधगती मशाल आहे. छगन भुजबळ हे शिवसेना एकटेच सोडून गेले होते; पण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने सोबत आले आहेत. नुसती राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसही सोबत घेऊन आले आहेत. त्यामुळे आम्ही आता धक्का प्रुफ झालो आहोत, असेही ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात उद्धव ठाकरे बोलत होते. छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘छगन भुजबळ यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तो आम्हाला बसलेला पहिला मोठा धक्का होता. संपूर्ण ठाकरे कुटुंबासाठी तो मोठा मानसिक धक्का होता. आपल्या कुटुंबातलाच एक माणूस सोडून जाऊ कसा शकतो, हा माँ आणि बाळासाहेब यांनाही धक्का होता. त्यातून मानसिकरित्या सावरायला आम्हाला खूपच वेळ लागला; पण भुजबळांनी एक बरे केले. बाळासाहेब होते तेव्हाच घरी येऊन त्यांनी सर्व मिटवून टाकले.अर्थातच तेव्हा माँ असत्या तर आणखीन बरे झाले असते. भुजबळ हे नशीबवान आहेत. त्यांना बाळासाहेब आणि शरद पवार ही दोन उत्तुंग व्यक्तीमत्वे मार्गदर्शक म्हणून लाभली; पण त्यांनी त्यांचा कधी दुरूपयोग केला नाही. स्वत:ची वाटचाल त्यांनी केली म्हणून आजही पंचाहत्तरीतही ते तरूण आहेत. भुजबळांचा राजकीय जन्मच शिवसेनेत झाला. पहिलीच निवडणूक ते हरले. पण हरूनही ते जिददीने उभे राहिले आणि आज ते जे आहेत ते करून दाखविले. भुजबळांच्या आधी आमचे वामनराव महाडिक हे पहिले आमदार जिंकून आले होते. ती देखील पोटनिवडणूकच होती असेही उदधव ठाकरे म्हणाले.

...तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते

भुजबळसाहेब हे सरकार वाचविण्यात वाकबगार आहेत असे आता दादा म्हणाले. आम्हाला आधी सांगितले असते तर मीच त्यांना कामाला लावले असते. भुजबळसाहेबांनी त्यावेळी शिवसेना सोडली नसती तर भुजबळ साहेब खूप आधीच मुख्यमंत्री झााले असते असेही उदधव ठाकरे म्हणाले. सध्या सतत आणि सतत राजकारणाचाच विचार सुरू आहे. विचाराने राजकारण कोणीच करत नाही. प्रतिस्पर्धी शिल्लकच राहिला नाही पाहिजे असाच विचार आहे. प्रत्येक गोष्टीत आम्हाला न्यायालयात जावे लागत आहे. मैदानासाठी देखील न्यायालयात जावे लागले. पण आता मी मैदानात उतरलो आहे. असेल हिंमत तर या समोर असे आव्हान देउन उदधव ठाकरे म्हणाले, फारूख अब्दुल्ला मला आल्या आल्याच म्हणाले, घाबरू नकोस. वडिलांसारखा लढ. ही लढाई मी आता सोडणार नाही असेही उदधव ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in