केंद्रातील भाजप सरकार विरोधात काँग्रेस ‘भारत जोडो’ पदयात्रा काढणार

मुंबई काँग्रेसतर्फे मंगळवारी क्रांती मैदानात देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांना अभिवादन करण्यात आले
केंद्रातील भाजप सरकार विरोधात काँग्रेस ‘भारत जोडो’ पदयात्रा काढणार

लोकशाही नष्ट करून देशाला तोडण्याचा प्रयास करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकार विरोधात काँग्रेस ‘भारत जोडो’ पदयात्रा काढणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ३,५०० किलोमीटरच्या या पदयात्रेस ७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून १२ राज्यांत ही पदयात्रा काढण्यात येईल, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

९ आॅगस्ट म्हणजेच क्रांतीदिननिमित्त मुंबई काँग्रेसतर्फे मंगळवारी क्रांती मैदानात देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांना अभिवादन करण्यात आले. चले जाव आंदोलनाची ८० वर्षे तसेच भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसने मंगळवारी ‘आझादी की गौरव यात्रे’चा प्रारंभ केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ९ ते १४ ऑगस्टदरम्यान मुंबईतील सहा जिल्ह्यांमध्ये ही ७५ किलोमीटरची गौरवयात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवारच्या पहिल्या पदयात्रेत ऑगस्ट क्रांती मैदानपासून नाना चौक, नॉव्हेल्टी सिनेमा, खेतवाडी ते अलंकार टॉकीजपर्यंतचे अंतर सर करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी दिग्विजय सिंह यांच्या सोबत भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि अन्य नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप सत्ता छोडो!

“हा तोच तेजपाल हॉल आहे. जिथे १३७ वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि हे तेच ऑगस्ट क्रांती मैदान आहे, जिथून ८० वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांनी अंग्रेजो भारत छोडो चा नारा दिला होता. गेल्या वर्षी आपण इथूनच ‘भाजप सत्ता छोडो’चा नारा दिला होता, असे भाई जगताप म्हणाले. त्याशिवाय आझादी की गौरव यात्रेद्वारे काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळवून दिले, देशासाठी कसे आणि किती बलिदान दिले याची संपूर्ण माहिती जनतेला देण्यात येणार आ

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in