मध्य रेल्वेकडून रेल्वे स्थानकांवर सहा नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी

मध्य रेल्वेकडून रेल्वे स्थानकांवर सहा नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी

देशात पर्यावरण रक्षणासाठी इलेक्िट्रक वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाने याची सुरुवात स्वतःपासून करत नागरिकांना इलेक्िट्रक वाहन वापरण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनेदेखील पुढाकार घेतला असून इलेक्िट्रक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवर लवकरच सहा नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे.

यामध्ये कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण, पनवेल आणि दादर रेल्वे स्थानकांवर चार्जिंग पॉइंट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. स्वच्छ पर्यावरणासाठी देशातील रस्त्यांवर येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात इलेक्िट्रक वाहने धावणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार शासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या असून, सध्या आपल्या आजूबाजूला विजेवर चालणाऱ्या (इलेक्िट्रकल) दुचाकी आणि बसचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. शासन दरबारी इलेक्िट्रक दुचाकी आणि बस यांच्या वापरावर अधिक भर देण्यात येत आहे.

इलेक्िट्रक गाड्या आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आपल्याकडेच विकसित केले जावे, यासाठी वाहनांची आणि त्यांच्या यंत्रभागांची निर्मिती करणाऱ्या कारखानदारांना सरकार प्रोत्साहित करीत आहे. यालाच हातभार म्हणून मध्य रेल्वेकडून रेल्वे स्थानकांवर सहा नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in