राफेल विमान खरेदी व्यवहार वादग्रस्त टिका राहुल गांधीच्या याचिकेत अ‍ॅडव्होकेट जनरलना पाचारण

गांधी विरोधात भाजपचे सदस्य महेश श्रीमल यांनी दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला
राफेल विमान खरेदी व्यवहार वादग्रस्त टिका राहुल गांधीच्या याचिकेत अ‍ॅडव्होकेट जनरलना पाचारण

मुंबई : राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याची तक्रार दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने अ‍ॅडव्होकेट जनरल विरेद्र सराफ यांना पाचारण केले आहे.

मंत्र्यांशी संबंधित मानहानीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या कलम १९९ अन्वये कोणती प्रक्रिया अवलंबली पाहिजे, या प्रश्नाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती सांरग कोतवाल हे अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे म्हणणे ऐकणार आहेत.

राजस्थान येथील सभेत २०१८ मध्ये राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करताना राहूल गांधी यांनी 'कमांडर इन थीफ, चौकिदार चोर है' आदी टीका केली होती. या वक्तव्यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व अन्य सदस्यांचीही प्रतिम मलिन झाली आहे. त्यामुळे गांधी विरोधात भाजपचे सदस्य महेश श्रीमल यांनी दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. याची दखल घेत गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्याने आणि राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांचा तक्रारीत समावेश करण्यात आल्याने राहुल गांधींच्या नावे २८ ऑगस्ट २०१९ मध्ये समन्स जारी करून हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in