गँगस्टर अबू सालेमला सत्र न्यायालयाचा झटका

१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने झटका दिला.
गँगस्टर अबू सालेमला सत्र न्यायालयाचा झटका

मुंबई : १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने झटका दिला. दुसऱ्या तुरुंगात आपल्या जीवाला धोका असून, आपल्याला तळोजा कारागृहातून हलवण्यात येऊ नये, अशी विनंती करणारा अर्ज फेटाळून लालवा.

कुख्यात गँगस्टर अबू सालेमला जीवाची भीती सतावत आहे. कारागृहातून दुसऱ्या कारागृहात घेऊन जाण्याच्या बहाण्याने आपली हत्या करण्यात येईल. आपला एनकाऊंटर होण्याची भीती वाटत असल्याने कारागृहातील टोळी संघर्षावरून जिवाची भिती असल्याच्या कारणास्तव तळोजा कारागृहातून अन्य कारागृहात हलविण्यास मनाई करावी, अशी विनंती करणारा अर्ज केला होता. या अर्जाचा राज्य सरकारने जोरदार आक्षेप घेतला .कैद्यांचे एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात स्थलांतर करणे ही सामान्य बाब असल्याचा दावा तुरुंग प्रशासनाने न्यायालयात केला होता. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाचा युक्तिवाद मान्य करत अबू सालेम याची मागणी फेटाळून लावली.

logo
marathi.freepressjournal.in