Covid19 Update : मुंबईत कोरोनाचे १६४ नवे रुग्ण; शून्य मृत्यू

दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६५१ वर स्थिरावली आहे
Covid19 Update : मुंबईत कोरोनाचे १६४ नवे रुग्ण; शून्य मृत्यू

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असून रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत घट होत आहे. सोमवारी दिवसभरात १६४ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २४ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६५१ वर स्थिरावली आहे. १७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३ हजार ४३७ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १ हजार ८८९ सक्रिय रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in