३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान क्रेडाई-एमसीएचआयचे गृहप्रदर्शन

२० वे गृहप्रदर्शन ३ ते ६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान वर्तकनगर, रेमंड ग्राऊंड येथे आयोजित
३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान क्रेडाई-एमसीएचआयचे गृहप्रदर्शन

कोरोना काळात आर्थिक मंदीची झळ सर्वच क्षेत्रात असून बांधकाम व्यवसायालाही याचे चटके सोसावे लागले होते त्या काळ्या काळातून रिअल इस्टेट मार्केट  बाहेर पडू लागले असून यंदा आशादायक वातावरणात  क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या विकासकांच्या संस्थेने २० वे  गृहप्रदर्शन ३ ते ६ फेब्रुवारी २०२३  दरम्यान  वर्तकनगर, रेमंड ग्राऊंड येथे आयोजित केले आहे.या प्रदर्शनात २५ लाखांपासुन ५ कोटीपर्यत ची घरे व व्यावसायिक गाळे विक्रीसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

२०व्या रिअल इस्टेट आणि एचएफसी एक्स्पोचे उद्घाटन रविवार ३ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालिका आयुक्त अभिजित बांगर त्यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
घर शोधणा-यांच्या सोयीसाठी ठाण्यातील प्रमुख मालमत्ता आणि गृह वित्त प्रदर्शन ठाण्याच्या रिअल इस्टेटने  केवळ जिवंतपणा आणि किंमतीची स्थिरता टिकवून ठेवली आहे. तसेच रिअल इस्टेटीचे मार्केट सध्या तेजीत असून तयार असलेल्या बहुतांशी मालमत्ता विकल्या गेल्या असून नव्याने मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु करण्यात आली आहेत. असे क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकारांना सांगितले.

या वर्षी एक्स्पोमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. क्रेडाई एमसीएचआय ठाणे द्वारे एक सांघिक प्रयत्न, अनेक रिअल इस्टेट विकासक आणि अग्रगण्य गृह वित्त पुरवठादार घर शोधणा-यांना हवे असलेले काही सर्वोत्तम पर्याय ऑफर करताना दिसतील. रिअल इस्टेट ब्रँड्स आणि होम फायनान्स प्रदात्यांच्या प्रतिनिर्धीशी थेट संवाद साधण्याच्या पर्यायासह एकाच रूफ खाली अनेक पर्यायांचा फायदा, अनेक घर शोधणारे कुटुंब त्यांच्या स्वप्नातील घर निवडता येणार आहे. ठाण्यात आपले आवडते घर घेण्यासाठी सर्वते सहकार्य ग्राहकांना करण्यात येणार असल्याचे एमसीएचआय क्रेडाई चे सचिव मनीष खंडेलवाल यांनी सांगितले. दरम्यान या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रॉपर्टी मार्केटमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून येत्या सहा महिन्यात त्याचे परिणाम दिसू लागतील असा आशावाद क्रेडाई एमसीएचआय चे माजी अध्यक्ष अजय अशर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in