
मुंबई : राज्य सरकारने इर्शाळवाडी दुर्घटनेचे बचावकार्य सायंकाळी ५ वाजता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम शुक्रवारी सकाळी ५ वाजता सुरू केले जाणार आहे. या निर्णयावर मुंबई मनपाचे माजी अधिकारी आय. सी. सिसोदिया यांनी टीका केली आहे.
भारत हा विकसनशील देश आहे. बचावकार्य कायम चालवण्यासाठी पॉवर जनरेटर व अन्य सामुग्री वापरल्या जातात. मलब्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न त्यांनी केला. काळोख, पाऊस हे बचावकार्य थांबण्याचे कारण असू शकत नाही. या कामासाठी लष्कराला पाचारण करावे. कारण त्यांच्याकडे सर्व यंत्रणा व ते उत्तम प्रशिक्षित असतात, असे त्यांनी सांगितले.