
मुंबई : मोबाईलसह लॅपटॉपच्या विम्यासाठी दिलेल्या सुमारे ४० लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सम्राट देवव्रत सेनगुप्ता या खासगी कंपनीच्या संचालकाला साकिनाका पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत सम्राटची पार्टनर संचालक नियती शहा ही सहआरोपी असून, तिचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. अशोक रामहक यादव हे व्यावसायिक असून, त्यांची एक कंपनी आहे. ही कंपनीत लॅपटॉप, मोबाईल खरेदी विक्रीसह बिघाड झालेल्या मोबाईल आणि लॅपटॉप दुरुस्तीचे काम करते.
तसेच कंपनीकडून मोबाईल आणि लॅपटॉपधारकांना विमा काढून देण्याचे काम दिले जाते. गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट महिन्यांत त्यांनी अॅपल आणि डेल कंपनीच्या ४४३ लॅपटॉप आणि सोळा आयफोनची विक्री केली होती. यावेळी त्यांच्या कंपनीने त्यांच्याकडून विमासाठी ३७ लाख ४० हजार रुपये घेतले होते.