डालमिया लायन्स खेळ महोत्सवाला सुरुवात

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. दिगंबर एन. गंजेवार यांनी स्वागत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इमेलिया नोरोन्हा, अतिथि परिचय श्रीमती सीमा शुक्ला व उपप्राचार्या डॉ. माधवी निघोसकर यांनी आभार प्रदर्शन केले.
डालमिया लायन्स खेळ महोत्सवाला सुरुवात

मुंबई : प्रहलादराय डालमिया लायन्स महाविद्यालयाच्या १३व्या आंतरमहाविद्यालयीन ‘डालमिया लायन्स खेळ महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ मुंबईच्या झोन-११चे पोलिस उपायुक्त अजय बन्सल तसेच लॉन टेनिसचे राष्ट्रीय खेळाडू तनिष्क जाधव यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन आणि आकाशात फुगे सोडून करण्यात आले.

महाविद्यालयाचे विश्वस्त व कर्णधार परिषदेचे महामंत्री कन्हैयालाल घ. सराफ यांनी सदर आयोजनाच्या उद्देशाचे महत्त्व रेखांकित करत सांगितले की, “रिंक फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि कॅरमसारख्या स्पर्धांमध्ये ४५ महाविद्यालयातील ९०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे.”

उदघाटन सोहळ्याप्रसंगी लायन श्यामसुंदर रुईया, लायन डॉ. शरद रूईया, लायन कमल रुईया, लायन विकास क. सराफ, लायन रजित मेहरा, लायन अमित अग्रवाल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवि अडाने, सुभाषिनी नायकर, किरण मिश्रा, अनिल बागडे व खेळ प्रशिक्षक राजेश मौर्या हजर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. दिगंबर एन. गंजेवार यांनी स्वागत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इमेलिया नोरोन्हा, अतिथि परिचय श्रीमती सीमा शुक्ला व उपप्राचार्या डॉ. माधवी निघोसकर यांनी आभार प्रदर्शन केले.

logo
marathi.freepressjournal.in