विक्रोळी व भांडुप परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याच्या इशारा

विक्रोळी व भांडुप परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याच्या इशारा

पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना लक्षात घेता डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. विक्रोळी, भांडुप परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. स्थलांतरित होण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत डोंगर उतारावर राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते. स्थलांतराच्या नोटीसही दिल्या जातात. यंदाही विक्रोळी व भांडुप परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना धोक्याच्या इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचा धोका असतो. त्यामुळे या भागातील धोकादायक इमारतींना, झोपड्यांना पालिकेने सावधगिरीच्या व सावधानतेच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना, जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असेही एस विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी सूचना केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in