
मुंबई : वांद्रे पश्चिम येथील देवसागर या अतिधोकादायक इमारतीचा काही भाग नुकताच कोसळला होता. तळ अधिक १३ मजली इमारत सी-वन अर्थात अतिधोकादायक असल्याने इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे ही इमारत आजुबाजूच्या इमारतींवर पडण्याचा धोका टळला, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वांद्रे पश्चिम कार्टर रोड येथील देवसागर या अतिधोकादायक इमारतीचा काही भाग नुकताच कोसळला होता. इमारत अतिधोकादायक असल्याने ती रिकामी करण्यात आली होती. मात्र इमारत कोसळण्याचा धोका लक्षात घेता, इमारत ताबडतोब जमीनदोस्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने हालचाल सुरू केली. एम. के. ट्रेडर्स या कंत्राटदाराच्या माध्यमातून नियोजन पद्धतीने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याचे मातुल्ला खान यांनी सांगितले.