Mumbai Rain : भर दुपारी मुंबई तसेच उपनगरात सर्वत्र काळोख, गडगडाटासह मुसळधार पाऊस

येत्या काही तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन
Mumbai Rain : भर दुपारी मुंबई तसेच उपनगरात सर्वत्र काळोख, गडगडाटासह मुसळधार पाऊस
ANI

दसरा झाल्यानंतर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने पुन्हा जोर पकडल्याचे चित्र आहे, मात्र आज भर दुपारी मुंबईसह उपनगरांमध्ये सर्वत्र काळोख करत मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक, काळे ढग, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्याचे वृत्त समोर येत आहे.

सायन, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अचानक सुरू झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. दुपारी 2.30 ते 5.30 वाजेपर्यंत मुंबईच्या उत्तर आणि दक्षिण भागात तसेच नवी मुंबई, रायगड परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील करी रोड, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला परिसरात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम अद्याप तरी झाला नाही.

येत्या काही तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in