डोंबिवलीत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा परिसरात रिजन्सी अनंत सोसायटीमध्ये भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात.
डोंबिवलीत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

डोंबिवली : सोसायटीतील प्ले झोनमध्ये खेळत असताना खाली पडून एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना मानपाडा परिसरातील रिजन्सी अनंतम या सोसायटीत घडली. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सक्षम उंडे असे मृत मुलाचे नाव आहे. तो एकुलता एक मुलगा होता. डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा परिसरात रिजन्सी अनंत सोसायटीमध्ये भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सक्षम कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमधील प्लेझोनमध्ये खेळण्यासाठी गेला. खेळत असताना तो अचानक खाली पडला. त्यावेळी उपस्थित असलेल्या कामगारांनी सक्षमला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in