कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने भारताला अमेरिकेचा दिलासा

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने 
भारताला अमेरिकेचा दिलासा

गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. भारतातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात आटोक्यात आल्याने अमेरिकेनेही आता भारताचा समावेश कोरोनाचा सर्वाधिक कमी धोका असणाऱ्या देशांच्या यादीत केला आहे. ‘यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन’ने भारताचा समावेश तिसऱ्या गटातून पहिल्या गटात केला आहे.

जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परदेशातून येणाऱ्या नागरिकांकडून या विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी इतर देशांप्रमाणे अमेरिकेनेही निर्बंध लादले आहेत. समोरच्या देशातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती पाहून या निर्बंधांमध्ये बदल केले जातात. तिसऱ्या लाटेतील कोरोना प्रादुर्भावामुळे अमेरिकेने भारताचा समावेश कोरोनाचा धोका असणाऱ्या देशांमध्ये तिसऱ्या गटात केला होता. मात्र, सध्या भारतातील रुग्णसंख्या लक्षणीयरित्या घटल्याने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय अमेरिकेतील प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू

अहमदनगर : कोरोनानंतर ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून सप्टेंबर महिन्यात संगमनेर बसस्थानकात आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला. नगर शहरातील पत्रकार चौकात एका ट्रकखाली दुचाकी चिरडून दोन युवक जागीच ठार झाले. त्यातील उद्धव सुभाष तलोरे (वय १९) हा त्या एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. तर त्याच्यासोबत प्रवास करणारा बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (वय २२) हाही ठार झाला आहे. त्याच्या वडिलांचाही पूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. हे दोघेही पाथर्डी तालुक्यातील महाविद्यालयात शिकत होते.

Related Stories

No stories found.