डेंग्यू प्रतिबंधात्मक माहिती आता मोबाइलवर मिळणार

पालिका मुख्यालयात सोमवारी 'मुंबई अगेन्स्ट डेंग्यू' या अँपचे लोकार्पण संजीवकुमार यांच्या हस्ते झाले.
डेंग्यू प्रतिबंधात्मक माहिती आता मोबाइलवर मिळणार

पावसाळी आजारांमध्ये डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आता डेंग्यू प्रतिबंधात्मक माहिती आता मुंबईकरांना मोबाइलवर मिळणार आहे. या अॅपमध्ये डेंग्यूची उत्पत्ती, प्रसार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. त्यामुळे 'मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ अॅप कुटुंबातील एका व्यक्तीच्या मोबाईल मध्ये असणे गरजेचे असून हा अॅप डाऊनलोड करुन घ्यावा, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी मुंबईकरांना केले आहे. पालिका मुख्यालयात सोमवारी 'मुंबई अगेन्स्ट डेंग्यू' या अँपचे लोकार्पण संजीवकुमार यांच्या हस्ते झाले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या पुढाकाराने व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ या भ्रमणध्वनी ॲपच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. ‘मुंबई अगेन्स्ट डेंग्यू’ हे भ्रमणध्वनी ॲप तांत्रिक कार्यपद्धतीनुसार पुढील साधारणपणे २४ ते ४८ तासांत ‘गुगल प्ले स्टोअर’सह अन्य प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध असणार आहे. तसेच प्रत्येक मुंबईकराने आपल्या अँड्रॉइड किंवा आयओएस आधारित भ्रमणध्वनीमध्ये हे ॲप इन्स्टॉल करावे आणि ॲपमध्ये देण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनांनुसार आपल्याच घराची पाहणी करुन आवश्यक तिथे योग्य त्या सुधारणा तातडीने करवून घ्याव्यात, असे आवाहन महा-नगरपालिकेच्या कीटकनाशक खात्याने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in