डिजिटल होर्डिंग्जमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर

स्टॅटिक होर्डिंग्जचे डिजिटल डिस्प्लेमध्ये रूपांतर
डिजिटल होर्डिंग्जमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर

मुंबई : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने डिजिटल होर्डिंग्जचे एलईडीत रुपांतर करण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल होर्डिंग्जच्या अंमलबजावणीमुळे जाहिरातीचे नवीन मार्ग खुले झाले आहेत आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जाहिरातदार आता नियमित परवाना शुल्काच्या १.५ पट भरून विद्यमान स्टॅटिक होर्डिंग्जचे आकर्षक डिजिटल प्रदर्शनांमध्ये रूपांतर करू शकतात.

या धोरणाच्या अंमलबजावणीपासून, एकूण सात होर्डिंग्जचे एलईडी डिस्प्लेमध्ये यशस्वीरित्या रूपांतर करण्यात आले आहे. या बदलामुळे केवळ जाहिरातींचे आधुनिकीकरण झाले नाही तर वार्षिक परवाना शुल्कातही लक्षणीय वाढ झाली आहे. या रूपांतरित होर्डिंग्समधून दरवर्षी अतिरिक्त १ कोटी ५३ लाख ९८ हजार ५७३ महसूल मिळणार आहे.

एलईडी होगिॅग्ज महसुलासाठी उत्तम पर्याय समोर आला असून, आणखी चार होर्डिंग्ज एलईडी डिस्प्लेत रूपांतरित करण्याछी प्रक्रिया सुरू आहे. हा विस्तार विभागाची त्याच्या मालमत्तेतून जास्तीत जास्त कमाई करण्याची आणि जाहिरातदारांना अत्याधुनिक जाहिरात प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
स्टॅटिक होर्डिंग्जचे डिजिटल डिस्प्लेमध्ये रूपांतर हे तंत्रज्ञानातील प्रगती स्वीकारण्याच्या आणि जाहिरातदार आणि प्रवाशांसाठी एकंदर अनुभव वाढवण्याच्या दृष्टीकोनानुसार आहे. डिजिटायझेशनचा अवलंब करून, रेल्वे केवळ पुढेच राहिली नाही, तर व्यवसाय वाढीसाठी आणि नाविन्यपूर्णतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करत आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'या' ठिकाणी डिजिटल होगिॅग्ज!
- कुर्ला आरोबी पूर्व बाजू
- सैयान रॉब (दोन बोर्ड)
-कांजूर रोड आरोबी
-टिळक नगर आरोबी
-सुमन नगर आरयूबी गॅन्ट्री साइट सी
ठाणे-कोपरी आरोबी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in