लंडनच्या धर्तीवर डबलडेकर एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

नितिन गडकरी यांच्या हस्ते इलेक्टि्रक वातानुकूलित बसेस लोकार्पण गुरुवारी नरिमन पॉइंट येथील टाटा थिएटर, एनसीपीए येथे झाले
लंडनच्या धर्तीवर डबलडेकर एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबईची शान असलेल्या डबलडेकर बसेसचा प्रवास आता गारेगार व आरामदायी होणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात इलेक्टि्रक वातानुकूलित बस दाखल झाली असून आरटीओच्या नोंदणीनंतर प्रीमिअम बस प्रवाशांच्या सेवेत लवकरच येणार आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते इलेक्टि्रक वातानुकूलित बसेस लोकार्पण गुरुवारी नरिमन पॉइंट येथील टाटा थिएटर, एनसीपीए येथे झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काॅफीटेबल बुक, अमृत महोत्सवी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

डबल डेकर बेस्टची शान!

बेस्ट मुंबईकरांची लाइफलाइन बोलली जाते. ३२ लाख प्रवासी बेस्टने रोज प्रवास करतात. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेतत्वावर एसी बसेस घेण्यात आल्या आहेत. डबलडेकर बस बेस्टची शान आहे. या बसेसचे आयुर्मान संपल्याने त्या भंगारात काढल्या जाणार आहेत. बेस्टकडून पर्यावरणाच्यादृष्टीने इलेक्टि्रक बसेस खरेदीवर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून नव्याने एसी इलेक्टि्रक डबलडेकर बसेस घेण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. लंडनच्या धर्तीवर बसेस मुंबईमध्ये सुरू केल्या जाणाऱ्या बसमधील पहिली बस हिंदुजा ग्रुप ऑफ कंपनीजचे अशोक हिंदुजा, अशोक लेलँडचे शोम हिंदुजा, स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्रात लोकार्पण करण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in