भांडवली खर्चात दुपटीने वाढ! मार्चपर्यंत १४ हजार कोटी रुपये खर्च

मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून मुंबईकरांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही मुंबई महापालिकेची जबाबदारी
भांडवली खर्चात दुपटीने वाढ! मार्चपर्यंत १४ हजार कोटी रुपये खर्च

मुंबई : मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ रस्ते देण्यासाठी ३९७ किमीचे सिमेंट क्राँकिटचे रस्ते, मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प, मुंबईच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी सौंदर्यीकरण, अशी विविध कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. या कामांवर १४ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. मार्च २०२०च्या तुलनेत मार्च २०२३ अखेरीस हा खर्च ७ हजारांनी अधिक झाल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून मुंबईकरांना मुलभूत सुविधा उपलब्ध देणे मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट क्राँकिटचे रस्ते करण्यावर भर द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले. त्यानंतर मुंबई महापालिकेने सिमेंट क्राँकिटच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटी रुपये खर्च केला आहे. तसेच कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात ऑक्टोबर २०१८ मध्ये झाली. या कामासाठी १२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु कोस्टल रोडच्या खर्चात विविध कारणांमुळे वाढ होत आहे. मुंबईचे सौंदर्यीकरण, सिमेंट क्राँकिटचे रस्ते, कोस्टल रोड अशा विविध कामांवर मार्च २०२३ अखेर १४ हजार कोटी रुपये खर्च झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मार्च २०२० अखेर भांडवली खर्च ७ हजार ५६८ कोटी रुपये इतका खर्च झाला. तर ३१ मार्च २०२३ अखेर भांडवली कामांवर १४ हजार कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. हा खर्च जवळपास दुप्पट आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१७ प्रकारची कामे सुरू!

रस्ते, पूल, उड्डाणपूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, हरितीकरण, आकर्षक विद्युत रोषणाई आदींचा समावेश असणारी, दीर्घकालीन गुणवत्तेची १७ निरनिराळ्या प्रकारातील कामे होत आहेत.

रस्त्यांचे पृष्ठीकरण, १३ स्कायवॉकचे सुशोभीकरण पूर्ण!

रस्ते विभागाकडून १२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे पृष्ठीकरण हाती घेण्यात आले आहे. तर यांत्रिकी व विद्युत विभागाने १३ आकाश मार्गिकांचे (स्कायवॉक) विद्युत सुशोभीकरण पूर्ण केले आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसर विकास प्रकल्प रस्ते विभागाने हाती घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in