पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चौपाट्यांवर ड्रोन

ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने अलीकडेच समुद्रकिनाऱ्यावर ट्रायल रन केले
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चौपाट्यांवर ड्रोन

मुंबई : समुद्र किनारी , चौपाट्यांवर अतिउत्साही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांसह आता ड्रोन तैनात असणार आहे. १०० किलो वजन उचलण्याची क्षमता असलेले पाच ड्रोन खरेदी करण्यात येणार असून, एका ड्रोनची किंमत सहा लाख रुपये असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गिरगाव, दादर, वसोॅवा, जुहू चौपाटी, अक्सा बीच असा चौपाट्यांचा परिसर मुंबईला लाभला आहे. मुंबईच्या समुद्र किनारी व चौपाट्यांवर लाखो पर्यटक येत असतात; मात्र काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून किनाऱ्यावर जातात. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन समुद्रात बुडण्याच्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वी जूहूच्या समुद्र किनाऱ्यावर चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. असे प्रकार सातत्याने घडत असल्याने यावर उपाययोजना म्हणून पालिकेने यावर रिमोट नियंत्रित पाच ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका ड्रोनची १०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमत असणार आहे. समुद्रात बुडालेली व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे ड्रोन अशा बुडणाऱ्या व्यक्तीला ओढून किनाऱ्यावर वेळेत आणू शकणार आहे. पालिका पाच ड्रोन खरेदी करणार असून, लवकरच जुहू बीचच्या सहा किमी लांबीच्या भागात तैनात करणार आहे.

ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने अलीकडेच समुद्रकिनाऱ्यावर ट्रायल रन केले. सुरुवातीच्या टप्प्यात पाच ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत अग्निशमन दलाकडून हा प्रस्ताव तयार केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in