
मुंबई : देशातर्ंगत कार्यरत असलेल्या एका ड्रग्ज तस्करीच्या मास्तरमाईंडला दिल्लीतून अंमलबजावणी संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने कोठडी सुनावली असून त्याच्या अटकेने ड्रग्ज तस्करीच्या इतर लिंकची धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२८ जून २०२३ या अधिकाऱ्यांनी कुरिअर टर्मिनलवरुन ५०० ग्रॅम कोकेनचा साठा जप्त केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत कोट्यवधी रुपये होती. याच गुन्ह्यांत या अधिकाऱ्यांनी मुंबईसह नालासोपारा येथून दोन तरुणांना ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या कटातील मास्तरमाईंड आरोपीचे नाव समोर आले होते. तोच देशांतर्गत ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या असल्याचे उघडकीस येताच त्याच्या अटकेसाठी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
आरोपींची सतत केलेली चौकशी, डिजिटल उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण करुन या अधिकार्यांनी संबंधित आरोपी दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती काढली होती. त्यानंतर या पथकाने दिल्लीतील उत्तमनगर परिसरातून या आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतले.