नव्या दमाचे उमदे सुशिक्षित नेतृत्व...

उमेदवार प्रतिनिधीपासून निवडणुकीतील सर्वच कामे आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दिवस-रात्र मेहनत घेऊन केली
नव्या दमाचे उमदे सुशिक्षित नेतृत्व...

मंदार यांनी बोर्ड सिव्हिल, एमडीए आणि कायद्याचे शिक्षणही घेतले आहे. आई प्रमिला आणि वडील मुकुंदशेठ केणी हे राजकारणात असल्याने त्याच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी मंदार यांनीच यशस्वीपणे सांभाळली आहे. बूथवर उमेदवार प्रतिनिधीपासून निवडणुकीतील सर्वच कामे आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने दिवस-रात्र मेहनत घेऊन केली. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात मंदार हा नवीन चेहरा उदयास आला. युवा कार्यकर्त्यांबरोबर प्रचाराची एक चांगली फळी त्यांनी निर्माण केली. त्याचाच फायदा होऊन प्रमिला आणि मुकुंदशेठ केणी भरघोस मतांनी निवडून आले. आई-वडील नगरसेवक असताना प्रभागातील समस्या आणि नवनिर्माणाची, विकासकामांची जबाबदारी मंदार यांनी स्वतःकडे घेतली. अनेक ठिकाणी मतदारसंघातील समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकारण करण्यावर त्यांनी भर दिला. पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेव्हाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यामुळे प्रचारातील अनेक बारकाव्यांचा त्यांना जवळून अभ्यास करता आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये

उमटवला वेगळा ठसा

राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मंदार यांनी यशस्वीपणे सांभाळली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विद्यार्थी संघटनेचे काम करत असताना तरुणांचे अनेक प्रश्न सोडविले. ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी काय हवे याचा विशेष अभ्यास केला. घोडबंदर भागात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करून त्या माध्यमातून शिक्षण संस्था, तसेच विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांमध्ये ठाण्यातील विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठीचे जे धोरण असते, ते योग्य प्रकारे राबविले जावे. तक्रार निवारणासाठी सुसज्ज केंद्र बनविले जावे. महाविद्यालय तसेच विद्यापीठामध्ये विद्यार्थी प्रतिनिधीसाठी खुल्या निवडणुका होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी अध्यक्षपदाच्या काळात मंदार यांनी विशेष प्रयत्न केले.

संपूर्ण प्रभाग वाय-फाय करण्याची

सर्वात पहिली संकल्पना

सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आल्यामुळे इंटरनेटची गरज वाढली. हल्ली कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गुगल आणि युट्यूबमधून मिळते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीही नेटचा चांगलाच उपयोग होतो. ही गरज लक्षात घेऊन प्रभाग संपूर्णपणे वाय-फाय करण्याची संकल्पना मंदार यांनी आई-वडील (मुकुंद आणि प्रमिला) यांच्याकडे मांडली. त्याला दोघांनीही प्रतिसाद दिल्यामुळे २०१५ मध्येच कळव्यातील ठाणे महापालिकेचा प्रभाग क्रमांक २३ हा ‘वाय-फाय’ झाला. प्रभागातील रहिवाशांनाही मोफत वाय-फायची सुविधा प्राप्त झाली. महापालिका किंवा कोणाचे प्रायोजकत्व न घेता मंदार केणी यांनी स्वखर्चातून ही संकल्पना अमलात आणली. या सुविधेचा प्रभागातील हजारो नागरिकांना फायदा झाला.

पर्यावरणभिमुख गणेशोत्सव

मंदार केणी यांनी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात शाडूच्या मूर्ती बनविण्याची अनोखी संकल्पना अमलात आणली. यामध्ये मूर्तीसाठीची माती आणि प्रशिक्षण अगदी मोफत देण्यात आले. हीच मूर्ती बनविणाऱ्याने घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी घेऊन जायची. त्यामुळे मूर्ती बनविण्याच्या समाधानाबरोबर त्याचा खर्च वाचतो. शिवाय, पर्यावरणभिमुख मूर्तीची घरी प्रतिष्ठापनाही होते, अशी आगळी संकल्पना मंदार केणी यांनी नवयुवकांमध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे.

यशस्वी व्यावसायिक

मुकुंदशेठ केणी यांच्या नंतरही ‘मंदार कन्स्ट्रक्शन्स’ची जबाबदारी मंदार केणी यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. लोकांना कशाप्रकारे चांगली घरे अल्प किमतीत उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. शिवाय, व्यवहारातही पारदर्शकता आणली. आश्वासन दिल्याप्रमाणोच घरांची उभारणी आणि ग्राहकाला दिलेल्या शब्दाप्रमाणे घरांचा ताबा अशा वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे ‘मंदार कन्स्ट्रक्शन’च्या सदनिकांनाही चांगली मागणी आहे. त्यामुळेच ‘मंदार कन्स्ट्रक्शन’ची उलाढाल अनेकपटींनी वाढवण्यात मंदार यांचा मोलाचा वाटा आहे. इथेच न थांबता ‘केणी ग्रुप ऑफ कंपनीज’ या नावाखाली मंदार यांनी अनेक नव्या व्यावसायिक क्षेत्रात उतरून नवीन व्यवसाय सुरू केले. यामध्ये अगदी ‘डेअरी इंडस्ट्रीज’, ‘शिपिंग इंडस्ट्रीज’, ‘प्रोडक्शन (फिल्म) इंडस्ट्रीज’ तसेच ‘हॉटेल इंडस्ट्रीज’मध्येही गुंतवणूक करून आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविली. प्रोडक्शन इंडस्ट्रीजमार्फत ‘संदूक’ आणि ‘येड्यांची जत्रा’ या दोन चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. या चित्रपटांबरोबरच त्यांनी चांगल्या मालिकांचीही निर्मिती केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in