आमचा जीव गेला तरी शिवसेना कधीच सोडणार नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात शिवसेनेने कायदेशीर कारवाईचे हत्‍यार उपसले
आमचा जीव गेला तरी शिवसेना कधीच सोडणार नाही, संजय राऊतांचे वक्तव्य

मंत्री उदय सामंत यांच्यापाठोपाठ शिवसेना नेते संजय राऊत यांचे सख्खे बंधू आमदार सुनील राऊत हेदेखील गुवाहाटीला जाण्याच्या चर्चा रविवारी संध्याकाळी सुरू झाल्‍या; मात्र याला संजय राऊत यांनी स्‍पष्‍ट नकार देत, आमचा जीव गेला तरी शिवसेना कधीच सोडणार नाही, असे स्‍पष्‍ट केले आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात शिवसेनेने कायदेशीर कारवाईचे हत्‍यार उपसले असले तरी अद्याप शिवसेनेला पडलेले खिंडार बुजायची शक्‍यता दिसत नाही. रविवारी तर मंत्री उदय सामंतच गुवाहाटीला पोहोचले. त्‍यांच्या पाठोपाठ संजय राऊत यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत हेदेखील गुवाहाटीला जाणार अशा चर्चा सुरू होत्‍या. तसे झाले असते तर शिवसेनेला विशेषतः संजय राऊत यांना तो मोठा व्यक्ि‍तगत झटका ठरला असता. मात्र, संजय राऊत यांनी स्‍पष्ट केले की, अशी कोणतीही शक्यता नाही. सुनील राऊत हे त्‍यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. माझा व राऊत कुटुंबीयांचा जीव जरी गेला तरी आम्‍ही शिवसेना कधीच सोडणार नाही. सोडून गेले त्‍यांच्या मानेवर जोखड ठेवल्‍याने त्‍यांनी तो निर्णय घेतला. आमच्याही मानेवर जोखड आहे; पण आम्‍ही बधलो नाही, असे राऊत म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in